संघाची विचारसरणी भाजपला मान्य आहे का? ठाकरेंचा भाजपला सवाल!

मुंबई : (Uddhav Thackeray On Devendra Fadanvis) दोन महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे 55 पैकी तब्बल 40 आमदार फोडून बंड पुकारले, त्यामुळे आख्खी शिवसेना मुळासोबत खिळखिळी झाल्याचे चित्र पहायला मिळालं. यातून बाहेर पडण्यासाठी शिवसेना आता मिळेल, आणि येईल त्यांना सोबत घेऊन मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, आज शिवसेनेने संभाजी ब्रिगेडचा हात पकडला आहे. याधी हिंदूत्त्वावर टिका करणाऱ्या आंबेडकरवादी प्रा. सुषमा अंधारे यांना पक्षात स्थान देवून त्यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. येत्या काळात असे अनेक प्रयोग पहायला मिळतील. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात आता वेगळं चित्र दिसणार आहे.
संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याबाबतच्या युतीची घोषणा केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्हाला विचारधारा वगैरे विचारण्यापेक्षा भाजपला संघाची विचारसारणी मान्य आहे का? असा सवाल उपस्थित केला. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत युती केली होती. भाजपचा पितृपक्ष असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक विचार आहे, पण त्या संघाचाच विचार भाजप मानत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले”.