ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

एकनाथ शिंदेंच्या कट्टर विरोधकाच्या हाती शिवबंधन, शिंदेंना बालेकिल्ल्यात तगडं आव्हान!

मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कट्टर विरोधकाने ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना भवनात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील नेते-पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश झाले. यावेळी ठाकरेंनी घाडीगावकरांना शिवबंधन बांधले.

एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक संजय घाडीगावकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. २०१९ च्या विधानसभेत घाडीगावकर काँग्रेसकडून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढले होते, मात्र त्यांचा पराभव झाला. त्याआधी नगरसेवक म्हणून ते महापालिकेत निवडून आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी घाडीगावकर यांचा प्रवेश करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. क्लस्टर योजनेतील आणि महापालिकेतील मोठ्या घोटाळ्यांचे आरोप घाडीगावकर यांनी केले होते. त्यामुळे शिंदेंनी त्यांच्या बालेकिल्ल्यातच ठाकरेंनी तगडं आव्हान उभा केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये