‘असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री बरा’ म्हणणाऱ्या शिंदेंना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले …

मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) दोन महिन्यांपुर्वी एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी शिवसेनेशी बंडखोर केली. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता टोकाला गेल्याचे पहायला मिळत आहे. आरे ला कारे, धराधरी, मारामारी, फोडाफोडी होताना दिसत आहे. आम्ही ठाकरे कुटुंबावर बोलणार नाही म्हणणारा शिंदे गट आता खूप खालच्या पातळीवर टिका करताना दिसत आहे. खाल्ल्या मिठाला जागणारे राजकारणात कोणीच नसते. मात्र, ज्यांनी शिवसेनेसाठी आयुष्य वेचलं आहे आज असे लोक देखील पक्षावर आणि पक्ष नेतृत्त्वावर बोलताना दिसत आहेत.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपण कंत्राटी मुख्यमंत्री म्हणल्याच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असल्याचे म्हटलं आहे. ते म्हणाले मुख्यमंत्री कोणीही असलं तरी त्यांची संदेश यंत्रणा चांगली हवी. केंद्राने एका निर्णयात कंत्राटी पद्धतीने सर्व काही करावं असं सांगितलं होतं. त्यावर मी, असं असेल तर आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीही कंत्राटी पद्धतीनं का नेमी नयेत अशी विचारणा केल्याचं त्यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं.
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनी ‘असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा’ असं प्रत्युत्तर दिलं होतं. यावर ठाकरेंना विचारण्यात आलं असता म्हणाले “बरं झालं ते माझ्यापासून दूर गेले. त्यामुळे असंगाशी जो संग होता तो गेला. मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. पण इतर वेळी त्यांच्या हेरयंत्रणा कार्यरत असतात, त्याप्रमाणे आमच्या भाषणाचीही नीट माहिती घेऊन बोलावं असा टोमणा त्यांनी यावेळी शिंदेंना लगावला”.