‘…त्याच हेलिकॉप्टरने इतर शेतकऱ्यांकडेही बघा’, शिवसेना प्रमुखांची मुख्यमंत्र्यावर ठाकरी तोफ..

मुंबई : (Uddhav Thackeray On Eknath Shinde) राज्यात ऐन पावसाळ्यात पावसाने मागील दीड महिन्यापासून दांडी मारल्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग अडचणीत सापडले. तर मराठवाड्यात दुबार पेरणी करावी लागली तरीही पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा संकटांशी सामना करावा लागला. दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहदनगर जिल्ह्याचा दौरा केला आहे.
दरम्यान, यावेळी त्यानी माध्यमाशी सांवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरी तोफ डागली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री आराम करण्यासाठी हेलिकॉप्टरने आपल्या शेतात जातात. मात्र राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याच हेलिकॉप्टरने इतर शेतकऱ्यांकडेही जावं असा टोला त्यांनी शिंदे यांना लगावला आहे.
सरकार आपल्या दारी म्हणत एकनाथ शिंदे यांच्याकडून दौरे केले जातात. मात्र या सरकारमधील ना पालकमंत्री आपल्या जिल्ह्याकडे लक्ष देतात. ना कृषी मंत्री लक्ष देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आता भरुन कसे निघणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शेतकऱ्यांची जिवापाड जपलेली पिकं करपून गेली तरीही या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही. त्यामुळे हे सरकार निघृण असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.