ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

ठाकरेंच्या शिवसेनेचं ठरलं! उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना दिली ‘या’ संदेशाची शिदोरी

मुंबई : (Uddhav Thackeray On Shivsena Leader) शिवसेना ठाकरे गटाची बैठक बुधवारी झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात ही बैठक झाली. बैठकीत राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची उपस्थिती होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात आगामी मेळावा, शिवसेना वर्धपान दिन यानिमित्ताने चर्चा झाली. बैठकीनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास यांनी निर्णयांची माहिती दिला. परंतु यावेळी निवडणुकीबांबत काहीच चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा 18 जून रोजी भव्य मेळावा मुंबईत होणार आहे. तसेच 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन हा आनंदोत्सवात साजरा केला जाणार आहे. जिल्हा प्रमुखांच्या शंकांचं निरसन आणि प्रश्नांची उत्तर सुद्धा या बैठकीत देण्यात आली. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत काहीच चर्चा झाली नसल्याचे अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सत्ता संघर्षाच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे निकालावरून संभ्रम निर्माण करत असल्याचं ठाकरे गटाच्या बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे बैठकीमध्ये जमलेल्या सर्व जिल्हाप्रमुखांना संपर्कप्रमुखांना सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत देऊन त्यातील महत्त्वाचे ठळक मुद्दे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे सूचना केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सरकारविरोधात लागला आहे. परंतु काही जण पेढे वाटप करीत आहेत. त्यामुळे तळागळापर्यंत हा निकाल पोहचण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर दिली असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे वास्तव तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत आणि जनतेपर्यत पोहोचण्यासाठी निकालाची प्रत आणि त्यातील ठळक मुद्दे कार्यकर्त्यांना आता सर्व जिल्हाप्रमुखांनी समजून सांगायचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील आपल्या बाजूने असलेले सकारात्मक मुद्दे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाची जबाबदारी या जिल्हाप्रमुखांकडे असणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या या बैठकीकडे राज्यातील शिवसैनिकांचे लक्ष होते. सत्तासंघर्षाचा निकालनंतर प्रथमच सर्व जिल्हाप्रमुखांना मुंबईत बोलवण्यात आले.यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये