ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

निवडणूक आयोगाच्या पडद्यामागील हालचालींना ब्रेक, न्यायालयाचा ठाकरेंना मोठा दिलासा!

नवी दिल्ली : (Uddhav Thackerey On Eknath Shinde) एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी केली. या बंडखोरीला दोन महिने उलटून केली. बंडखोरी केलेल्या शिंदे गटाने शिवसेना आणि सेनेचा धनुष्यबाण आपलाच असल्याचा वाद न्यायालयात व निवडणूक आयोगाकडे केला आहे. तर याला आव्हान देणारी याचिका शिवसेनेकडून दाखल करण्यात आली आहे. यावर मागील दोन महिन्यापासून न्या चार सुनावण्या पार पडल्या आहेत. मात्र अद्याप कोणताही निकाल हाती लागलेला नाही.

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण आम्हाला मिळावा म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. न्यायालयाचा निकाल होण्याअगोदर निवडणूक आयोग चिन्हाचा निकाल लावेल, अशी भीती मनात असल्याने उद्धव ठाकरे गटाने तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार आज झालेल्या सुनावणावेळी निवडणूक आयोगाच्या आधी सर्वोच्च न्यायालय निरीक्षण नोंदवणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा मोठा दिलासा मानण्यात येतोय. याआधीच्या सुनावणीवेळी शिवसेनेच्या चिन्हाबद्दल कोणताही निर्णय घेऊ नका, असे आदेश न्यायालयाने दिले होते.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण तातडीने सुनावणीसाठी मांडण्याचा ठाकरे गटाकडून प्रयत्न होतोय. प्रकरण घटनात्मक पीठाकडे द्यायचं की नाही या निर्णयासाठी सुनावणी लांबणीवर टाकत असल्याचा निर्वाळा सरन्यायाधीशांनी दिला आहे. निवडणूक आयोगाने तारीख दिल्याचंही ठाकरे गटाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. आज याचविषयी झालेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाच्या आधी सर्वोच्च न्यायालय निरीक्षण नोंदवणार आहे. १९ तारखेला सरन्यायाधीश रमणा चिन्हाविषयी निरीक्षण नोंदवतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये