महाराष्ट्ररणधुमाळी

“…तोपर्यंत मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा”

सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणामुळे सामान्य जनता देखील त्रस्त आहे. अशाच त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने चक्क राज्यपालांना पत्र लिहीत मला मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे. शिवसेनानेते एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्याच पक्षविरोधात बंड पुकारलं आहे. त्यामध्ये शिवसेनेचे काही आमदार आणि अपक्ष आमदार मिळून ५० पेक्षा जास्त आमदार आहेत. यासर्व राजकीय नाट्याला कंटाळलेली जनता आता पत्राद्वारे आपली बाजू मांडत आहे.

बीड जिल्याह्यातील श्रीकांत विष्णू गदळे या शेतकऱ्याने २२ जून रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी करणारं पत्र सादर केलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी मी शेतकरी पुत्र श्रीकांत विष्णू गदळे राहता दहिफळ तालुका केज, जिल्हा बीडचा रहिवाशी असून मी १० ते १२ वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात आहे. शेतकर्यांच्या गोरगरिबांच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं आहे. काही भागांमध्ये पावसाअभावी शेतकरी पेरणी करू शकत नाही, यात शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. यामध्ये सरकारदेखील मदत करत नाही.

दरम्यान, अनेक आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांना न्याय मिळणं गरजेचं आहे. मला मुख्यमंत्री करावं ही विनंती. मी जनतेचे सर्व प्रश्न नक्की सोडवेल. तसंच हे पत्र लवकरात लवकर बीड जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यपालांकडे पाठवावं असं देखील श्रीकांत विष्णू गदळे यांनी त्या पत्रात लिहलं आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेला देखील सरकार आपल्याकडे कधी लक्ष देणार असे प्रश्न पडत आहेत. कृषिमंत्री दादा भुसे देखील एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाली आहेत. यामुळे शेतकर्यानी चिंता व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये