ताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाहनधारकांना दिलासा! नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई | Toll Plaza – वाहनधारकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. आता मोठ्या टोल टॅक्सपासून (Toll Tax) वाहनधारकांची सुटका होणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी घोषणा केली आहे. नवीन नियमांनुसार टोल टॅक्समध्ये सूट देण्यात येणार आहे. यासंदर्भात संपूर्ण यादीही जारी करण्यात आली आहे.

आता अनेक वाहनधारकांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही. यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. NHAI कडून टोल टॅक्स वसूल केला जातो. तसंच आपण हायवेरून चार चाकी वाहनाने प्रवास करत असाल तर, आपल्याला हा टॅक्स द्यावा लागतो. तर आपण दूचाकीनं प्रवास करत असाल तर आपल्याकडून टोल टॅक्स घेतला जात नाही.

सध्या टोल टॅक्स वाहनाच्या लांबीवरून आधारीत आहे. सिंगल जर्नीसाठी टोलची किंमत वेगळी असते. तसंच, आपल्याकडे रिटर्न टोल टॅक्सचीही व्यवस्था असते. सोबतच सातत्यानं हायवेवरून प्रवास करणारे लोक पासच्या सुविधेचाही वापर करू शकतात.

या लोकांना द्यावा लागणार नाही टोल टॅक्स

भारताचे राष्ट्रपती

भारताचे उपराष्ट्रपती

भारताचे पंतप्रधान

भारताचे मुख्य न्यायाधीश

राज्याचे राज्यपाल

कॅबिनेट मंत्री

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

लोकसभाध्यक्ष

राज्य मंत्री

मुख्यमंत्री

नायब राज्यपाल

सामान्य अथवा समकक्ष रँकचे चीफ ऑफ स्टाफ

कुठल्याही राज्याचे विधानसभा अध्यक्ष

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

विधान परिषदेचे अध्यक्ष

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

भारत सरकारचे सचिव

राज्य परिषद

संसद सदस्य आर्मी कमांडर, व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ

संबंधित राज्यांमध्ये राज्य सरकारचे मुख्य सचीव

विधानसभा सदस्य

राज्याच्या दौऱ्यावर असलेले परदेशी मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये