ज्येष्ठ तेलुगू अभिनेते कैकला सत्यनारायण यांचं निधन
![ज्येष्ठ तेलुगू अभिनेते कैकला सत्यनारायण यांचं निधन kaikala satyanarayana](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/12/kaikala-satyanarayana-780x470.jpg)
मुंबई | Kaikala Satyanarayana Passed Away – दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कैकला सत्यनारायण (Kaikala Satyanarayana) यांचं निधन झालं आहे. ते 87 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्याच्या अनेक समस्यांशी झुंज देत होते. मात्र, आज (23 डिसेंबर) त्यांनी त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. तसंच कैकला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
कैकला सत्यनारायण यांच्यावर उद्या (24 डिसेंबर) महाप्रस्थानम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तसंच प्रसिद्ध निर्माते वामसी शेखर यांनी ट्विटरच्या माध्यमातून कैकला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी दिली. सत्यनारायण यांच्या निधनानं तेलुगू चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तसंच सत्यनारायण यांचे चाहते आणि अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत.
तेलुगू चित्रपटसृष्टीत कैकला सत्यनारायण हे सर्वात प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी 770 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनयाबरोबरच निर्मितीक्षेत्रातसुद्धा त्यांचं योगदान आहे. तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपट KGF चं देखील त्यांनीच वितरण केलं होतं.