ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

‘मी पुन्हा येईन’ फडणवीसांचा व्हिडीओ डिलीट केल्यानंतर विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला; म्हणाले, “एक बाशिंग बांधून दोन जण तयार…”

मुंबई | Vijay Wadettiwar : सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ‘मी पुन्हा येईन’ म्हणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. गुरूवारी भाजप (BJP) महाराष्ट्र या X हँडलवर देवेंद्र फडणवीस यांची ‘मी पुन्हा येईन’ ही कविता पोस्ट करण्यात आली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे अवघ्या एक तासातच भाजपनं ही पोस्ट डिलीट केली होती. यावरून आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांचा मी पुन्हा येईन हा व्हिडीओ भाजपनं पोस्ट केला होता. हा व्हिडीओ पुढच्या तासाभरातच डिलीट करण्यात आला. याचा अर्थ असा की मी पुन्हा येणार नसल्याचे हे संकेत आहेत. तसंच एक बांशिग बाधून दोन जण तयार आहेत. यांची (भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट) सत्ता येणार नसली तरीही हे नवरदेव बनून बसले आहेत, असा खोचक टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे.

आत्ताचं सरकार अध्यक्षांच्या भरवशावर सुरू आहे. राज्यात 2024 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तसंच काल जो व्हिडीओ पोस्ट करण्यात आला तो सहज केला नव्हता. आतमध्ये नक्कीच काहीतरी शिजतंय, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये