ताज्या बातम्यारणधुमाळी

“शिवसेनेत गद्दारीची कीड रामदास कदमांनीच…”, विनायक राऊतांचा खळबळजनक दावा

रत्नागिरी | Vinayak Raut On Ramdas Kadam – एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेसोबत बंडखोरी करून 40 आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेना विरूद्ध शिंदे गट असा सामना राजकारणात पहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तसंच दसरा मेळावा, खरी शिवसेना कुणाची यावरून चांगचाल कलगीतुरा रंगल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवेसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

रामदास कदम यांनी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर सातत्याने टीका केली आहे. या संदर्भात रत्नागिरीत विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना कदम यांच्या टीकेला गांभीर्यानं घेत नसल्याचं म्हटलं आहे. “रामदास कदमांनी सध्या जे बरळण्याचं काम सुरू केलं आहे, ते आम्ही फारसं गांभीर्यानं घेत नाही”, असं विनायक राऊत म्हणाले.

शिवसेनेत गद्दारीची कीड सर्वप्रथम रामदास कदम यांनीच रूजवली, असं विनायक राऊत म्हणाले. नारायण राणे (Narayan Rane) जात असतानाही त्यांच्यासोबत चार दिवस त्यांच्या बंगल्यावर रामदास कदम मुक्कामाला होते. तेव्हा शिवसैनिकांना फुटून नारायण राणेंसोबत येण्यासाठी वारंवार सांगण्यात रामदास कदम आघाडीवर होते. त्यात मी पुरावा द्यायची गरज नाही, असंही राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले, काही दिवसांपूर्वीच राणेंवी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात रामदास कदमांना फोन लावला आणि त्यांच्या निष्ठेच्या बाबतीतलं वस्त्रहरण केलं, ते सगळ्या जनतेनं ऐकलं आहे. त्यामुळे आत्ता रामदास कदम यांना अक्कलदाढ सुचली असेल आणि ते शिवसेनेला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न करत असतील , तर त्यांनी तो करू नये. तुमची जागा आणि तुमची निष्ठा काय आहे हे लोकांनी यापूर्वीच ओळखलेलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये