दारूच्या नशेत केलेले कृत्य विनोद कांबळीला पडले महागात; पत्नीने केले गंभीर आरोप

Vinod Kambli : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी नेहमीच आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिलाय. तो याआधी सुद्धा अनेकवेळा वादात अडकला आहे. आता पुन्हा एकदा नव्या वादात अडकला आहे. यावेळी पत्नीला मारहाण केल्याचा आरोप विनोद कांबळीवर झाला आहे. त्याच्या विरोधात पत्नीनेच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
विनोद कांबळीच्या पत्नीने केलेले आरोप
विनोद कांबळीने दारु पिऊन शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केलाय. भांडण फक्त शिवागाळीपुरता मर्यादीत राहिलं नाही. कांबळी किचनमध्ये गेला, त्याने कुकिंग पॅन उचललं आणि पत्नीच्या डोक्यावर फेकून मारलं. विनोद कांबळी विरोधात तक्रार नोंदवण्याआधी त्याच्या बायकोने भाभा हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतले, असं पोलिसांनी सांगितलं. विनोद कांबळीच प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी सुद्धा तो वादात अडकला आहे. वांद्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळी विरोधात IPC च्या कलम 324 आणि 504 अंतर्गत FIR नोंदवण्यात आलाय.