ताज्या बातम्यादेश - विदेश

विश्व हिंदू परिषदेने जाहीर केली देशातील हिंदूंवरील हल्ल्यांची यादी

भारतात हिंदू समाजावर, उत्सवांवर आणि मंदिरांवर सातत्याने हल्ले होत आहेत, या हल्ल्यांची यादी जाहीर करुन विश्व हिंदू परिषदेने निषेध नोंदवला. विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले की, हिंदू समाजावर होत असलेले हल्ले हे सिद्ध करतात की जिहादी हे आक्रमक आहेत. ते म्हणाले की, सत्तेच्या लालसेपोटी काही पक्ष हिंसक प्रवृत्तींना प्रोत्साहन देत आहेत. देशाला गृहयुद्धाकडे नेण्याची प्रेरणा देत आहेत. प्रत्येक नागरिकाने देशाची घटना, कायदे, न्यायव्यवस्था आणि राष्ट्रीय संस्कृती आणि परंपरा यांचा आदर करणे आवश्यक आहे. शांततापूर्ण सहजीवनासाठी ही एक आवश्यक अट आहे, असे जैन म्हणाले.

डॉ. जैन म्हणाले की, जानेवारी २०२३ पासून २०२४ च्या छठपूजेपर्यंत ३०० हून अधिक हल्ले आणि अत्याचाराच्या घटना झाल्या आहेत. संपूर्ण जग आधीच टेरर जिहाद, लव्ह जिहाद, लँड जिहाद, लोकसंख्या जिहादने त्रस्त आहे, आता स्पिट जिहाद, युरिन जिहाद, ट्रेन जिहाद, मायनर जिहाद इत्यादींच्या माध्यमातून गैरमुस्लिमांबद्दलचा त्यांचा द्वेष समोर येत असल्याचे ते म्हणाले. यासाठी हिंदू समाजाने संघटित राहण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले.

भारतातील अनेक मौलाना आणि मुस्लिम नेते हिंदू समाजाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत, असे ते म्हणाले. मात्र, या धमक्यांवर धर्मनिरपेक्ष समाजाचे मौन धक्कादायक आहे. १९४६ मध्येही अशाच प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये