ताज्या बातम्यामनोरंजनरणधुमाळी

अभिनेते शरद पोक्षेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट; म्हणाले, “हे चित्र आम्हा हिंदूंना…”

मुंबई | सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. त्यांनी मंगळवारी (5 जुलै) मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. तसंच श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. त्याचबरोबरीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यादरम्यानचा फोटो देखील समोर आला. हा फोटो पाहून अभिनेते शरद पोंक्षे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत असल्याचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्याबरोबर इतर त्यांचे काही सहकारी देखील दिसत आहेत. हा फोटो शेअर करत शरद पोंक्षे म्हणाले, “मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे सावरकरांना मानवंदना देण्यासाठी गेले. हे चित्र आम्हा हिंदूंना सुखावणारं आहे.” शरद पोंक्षे यांच्या या पोस्टला अनेकांनी पसंती दर्शवली आहे.

दरम्यान, शरद पोंक्षे यांनी याआधीही एकनाथ शिंदे यांच्याबाबतची एक पोस्ट शेअर केली होती. आपल्या आजारपणामध्ये एकनाथ शिंदे यांनी मदत केली असल्याचंही शरद पोंक्षे यांनी म्हटलं होतं. तसंच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांचं अभिनंदन देखील त्यांनी केलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये