नक्की या बाळाचा बाप कोण?; पुतिन यांनी तर झटकले हात!
![नक्की या बाळाचा बाप कोण?; पुतिन यांनी तर झटकले हात! vladimir putin](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/vladimir-putin-780x470.jpg)
मॅास्को | रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे रशिया आणि युक्रेन युद्धामुळे चांगलेच चर्चेत आहेत. तसंच आता ते आणखी एका नवीन कारणामुळे चर्चेत आले आहेत. व्लादिमीर पुतिन हे वयाच्या 70 व्या वर्षी बाप होणार आहेत. त्यांच्या गर्लफ्रेंडनं गुडन्यूज दिली आहे. विशेष म्हणजे ही गुडन्यूज ऐकल्यानंतर खुद्द पुतिनही हैराण झाले आहेत. व्लादिमीर पुतीन हे 69 वर्षांचे आहेत तर त्यांची गर्लफ्रेंड एलिना काबएवा ही 38 वर्षांची आहे. ऑलिंपिंक गोल्ड मेडलिस्ट असलेल्या एलिनसोबत पुतिन 2008 पासून सिक्रेट रिलेशनमध्ये होते. पुतिन यांच्यापासून एलिनाला दोन मुलं असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र पुतिन यांनी एलिनासोबतच्या आपल्या संबंधांबाबत कधीच खुलासा केलेला नाही.
रशियातील एका टीव्ही चॅनलने एलिना पुन्हा गरोदर असल्याचं वृत्त दिलं आहे. जनरल एसवीआर टेलिग्रामनं याबाबतचा दावा केला आहे. हे न्यूज चॅनल क्रेमलिनचे माजी अधिकारी चालवतात, असं बोललं जातं. रशियातील राष्ट्रपती कार्यालयातील गुप्त अधिकाऱ्यांमार्फत हे चॅनल चालवलं जात असल्याचंही सांगितलं जातं. तसंच गर्लफ्रेंड गरोदर असल्याचं कळताच पुतिन यांच्या वागण्यात, त्यांच्या देहबोलीत बदल जाणवला असल्याचं तिथल्या माध्यमांचं म्हणणं आहे.
दरम्यान, रशियातील चॅनलने दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन आणि एलिना यांना पहिल्यांदा 2005 मध्ये मूल झालं होतं. स्वित्झर्लंडमध्ये एलिनानं एका बाळाला जन्म दिल्याचाही दावा या चॅनेलकडून करण्यात आला आहे. मात्र सध्या एलिनाच्या पोटात असलेलं बाळ हे दुसऱ्याच कोणाचं तरी असल्याचा संशय पुतिन यांना असल्याची कुजबूज सुरू झाली आहे.