“आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही”-संजय राऊत
![“आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही"-संजय राऊत Devendra Fadnavis Dhananjay Munde 3](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/Devendra-Fadnavis-Dhananjay-Munde-3-780x470.jpg)
मुंबई : आता राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेच्या ६ जागांसाठी लवकरच निवडणूक पार पडणार असून संभाजीराजे छत्रपतींच्या (Sambhaji Raje) उमेदवारीवरून राजकारनाणं वेगळं वळण घेतलं आहे. याच पार्शवभूमीवर शिवसेना उमेदवार संजय राऊत(sanjay raut) यांनी भाजपवर टीका केली आहे. तसंच त्यांनी स्पष्ट केलं आहे की, मी आणि संजय पवार(sanjay pawar) यांनी विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तर याच राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती(sambhaji raje) यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राज्यसभा निवडणुकीत रंगत निर्माण झाली, असून त्यातच दोन उमेदवार आरामात राज्यसभेवर निवडून जाण्याची खात्री असताना भाजपान तिसरा उमेदवार देखील उभा करत असल्याचं देखील साम्गीतल आहे. यामुळे आता निवडणूक बिनविरोध न होता चिघळली जाईल का काय असं चित्र दिसत आहे.
दरम्यान, संजय राऊत(sanjay raut)म्हणाले की, आमचे दोन्ही उमेदवारानी अर्ज भरला आहे. तेव्हा आमचे सर्व खासदार, संपूर्ण महाविकास आघाडीतीळ नेते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात उपस्थितीत होते. तसंच त्यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटलं की, “भाजपानं तिसरा, चौथा, पाचवा उमेदकर द्यावा. आम्ही आमच्या जागा निवडून आणू. ईडी,(Ed)सीबीआय यांचा दबाव टाकून त्यांच्या जागा जिंकून येणाऱ्या असतील, तर त्यांनी प्रयत्न करत राहवं. आमची काही अडचण नाही. देशात लोकशाही आहे. आमच्या जागा लढण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. “आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही” अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला.