ताज्या बातम्यारणधुमाळी

“आम्हाला तयारीची गरज नाही, शिवतीर्थावर गर्दी होणारच”

मुंबई | Nilam Gorhe – कोणाला कितीही तयारी करू द्या, आम्हाला तयारीची गरज नाही, शिवतीर्थावर गर्दी होणारच अशा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. तसंच मनातील उर्मी ज्यांच्याकडे आहे, ते सर्व शिवतीर्थावर येणारच. शिवाय उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पाठिशी असलेले सर्वच शिवसैनिक हे शिवतीर्थावर येतील, शिवसेनेचे विचार ऐकायला मिळतील, त्यामुळे प्रत्येक शिवसैनिक शिवतीर्थावर येऊन शिवसेनेच्या विचारांशी एकनिष्ठ असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) (27 सप्टेंबर) नाशिक दौऱ्यावर असून आज त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

सध्या राज्यभरात दार उघड बये अभियान सुरू असून महिलांना संधी मिळावी, न्याय मिळावा यासाठी 61 मंदिरात महिला जाऊन दर्शन घेणार आहेत. चांदवड, सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेणार तिथला प्रसाद शिवतीर्थावर उध्दव ठाकरे यांना देणार असल्याचंही गोऱ्हे यांनी सांगितलं. तसंच शेतकरी आत्महत्या असे प्रश्न आहेत, इगतपुरी कातकरी समाजाच्या मुलीचं अपहरण केलं जातं. कामाला जुंपलं जातं, याचा अहवाल पोलीस अधिक्षक यांच्याकडे मागितला होता, मात्र अद्याप दिला नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

दरम्यान, निलम गोऱ्हे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील मुलीच्या मृत्यूबाबत रोष व्यक्त केला आहे. नंदुरबारचे प्रकरण धक्कादायक असून 41 दिवस मृतदेह पुरून ठेवला जातो, तरीही न्याय मिळाला नाही. स्थानिक पोलिसांशी संवाद साधला. सूत्र हलल्यानंतर माध्यमांमधून बातमी आली. त्यानंतर ही घटना पुढे आली. लखीमपूरच्या घटनेसारखी घटना आहे. बलात्कार करायचा खून करायचा आणि आत्महत्या दाखवायची, असा फंडा सध्या चालू आहे. अमित शहा (Amit Shah) यांना यासंदर्भातील माहिती दिली, कारवाई करण्यास सांगितलं, मात्र काही रिप्लाय नाही. त्याचबरोबर महागाई वाढली असून वेदांता सारखे प्रकल्प गेले, रोजगार गेले आहेत, असं निलम गोर्हे म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये