“…आमची मतं आम्ही शिवसेनेला देणार”- अजित पवार
!["...आमची मतं आम्ही शिवसेनेला देणार"- अजित पवार Devendra Fadnavis Dhananjay Munde 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/Devendra-Fadnavis-Dhananjay-Munde-1-780x470.jpg)
मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी भाष्य केलं होतं की, आमची मतं आम्ही शिवसेनेला देणार असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. आमचा ४२ मतांचा कोटा आहे. त्यांच्याकडे २७ ते २८ मत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच आज पवार यांनी राज्यसभेच्या निवडणुकी संदर्भात संभाजी राजेंसोबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार(sharad pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(Uddhav thackery) चर्चा केली होती. परंतु काय चर्चा झाली याबद्दल माहित नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर मंत्री अनिल परब(Anil Parab)यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईबाबतही अजित पवार यांनी केंद्रीय यंत्रणेला सवाल विचारला आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेने कोल्हापूर सेना प्रमुख संजय पवार(sanjay pawar) यांना उमेदवारी दिली असून छत्रपती संभाजीराजे यांचा पत्ता कट केला आहे. तसंच शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे की, सहाव्या जागेसाठीच्या उमेदवारीचा विषय आमच्यासाठी संपला आहे. दरम्यान,अजित पवार म्हणाले, शिवसेनने सुरवातीपासूनच संभाजीराजेंना शिवसेनेत येण्यासाठी आमंत्रण दिल होतं. परंतु आता वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहेत. कोणी कोत्या पक्षात जायचं हा ज्याचा त्याचा निर्णय असल्याचंही अजित पवार म्हणाले.
तसंच पवार यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईबाबत केंद्रीय यंत्रनेला सवाल विचारत म्हणाले की, केंद्रीय यंत्रणा आवळ्या अधिकाराचा वापर कसाही करत आहेत. परंतु हे समजलं नाही की कश्याच्या आधारावर एवढ्या कारवाई केल्या जात आहेत. आतापर्यंत महाविकास आघाडीतील नेत्यांवर अनेक कारवाई झाल्या आहेत.याचबरोबर माझ्याही नातेवाईकांसंदर्भात तपास केला जात आहे.हे सगळं कश्याच्या आधारावर चालू आहे. असा सवाल देखील पवार यांनी विचारला.