ताज्या बातम्यारणधुमाळी

“किरीट बोंबलत फिरते तेव्हा कमलाबाई कुठे लपुन बसते”

मुंबई | Deepali Sayed On Kirit Somaiya | शिवसेना (Shivsena) नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) या दररोज भाजपावर (BJP) निशाणा साधताना दिसत आहेत. तसंच आज त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना टार्गेट केलं आहे. दिपाली सय्यद यांनी ट्विटच्या माध्यमातून किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. “दिल्लीतल्या बापाला प्रतिउत्तर केले तर यांना झोंबत असते. जेव्हा यांचे किरीट बोंबलत फीरते तेव्हा कमलाबाई कुठे लपुन बसते. लबाड लांडगा ढोंग करतंय, महाराष्ट्र प्रेमाचं सोंग करतंय. महाराष्ट्रद्रोह्यांना भोसल्यांची लेक पुरून उरणार.” असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं आहे.

दिपाली सय्यद मागच्या काही दिवसांपासून आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी ट्विट करत भाजपला प्रश्न विचारलेत. काही दिवसांआधी त्यांनी असंच ट्विट केलं होतं. “अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलाल तर पंतप्रधानांची आठवण करुन देऊ. दिल्लीत मुजरा करणाऱ्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवुन देऊ. दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही. जय महाराष्ट्र.” असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं होतं.

दरम्यान, दिपाली सय्यद या भाजपावर सातत्याने टीकेचे बाण सोडताना दिसत आहेत. त्यांनी पंतप्रधानांबात आणखी एक मोठं विधान केलं होतं. ते प्रचंड चर्चेत आहे. दिपाली यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर परखड शब्दात टीका केली आहे. “नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shaha) तुम्ही मसनात जा,” असं दिपाली सय्यद म्हणाल्या. शिवाय, “महागाई दरवाढी आटोक्यात येत नसेल तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या,” असं देखील त्या म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये