ताज्या बातम्या

तिरंग्याचा अपमान होतानाचा व्हिडिओ पाहून मेजर सुरेंद्र पुनिया संतापले

प्रजासत्ताक दिन साजरा करून अगदी काहीच दिवस झाले आहेत. यातच सोशल मीडियावर एक तिरंग्याचा अपमान होतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. तोच व्हिडीओ मेजर सुरेंद्र पुनिया (Major Surendra Poonia) यांनी पोस्ट करत त्यावर आपला संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती तिरंगा झेंडा हातात घेऊन टेबल आणि खुर्च्या पुसताना दिसतो आहे. ती व्यक्ती कोण आहे? हे अजूनही समजू शकलेलं नाही. मात्र तिरंग्याचा अपमान करणारे हे बेशरम लोक कोण आहेत असा प्रश्न मेजर सुरेंद्र पुनिया यांनी हा व्हिडिओ ट्विट करत केला आहे.

तिरंग्याचा अपमान होतानाचा व्हिडिओ व्हायरल

तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून अनेकदा सरकारकडूनच आवाहन केलं जातं. अशात या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तिरंगा घेऊन चक्क टेबल खुर्च्या पुसताना दिसत आहे. तिरंग्याचा हा अपमान पाहून मेजर सुरेंद्र पुनिया यांनी हा व्हिडिओ ट्विट करत हे बेशरम लोक नेमके कोण आहेत? तिरंग्यासोबत ते काय करत आहेत असे प्रश्न विचारत संताप व्यक्त केला आहे.

हा व्हायरल होणारा व्हिडिओ मुंबईतला (Mumbai) असल्याचा अंदाज बांधला जात आहे . कारण या ट्विटवर मेजर पुनिया यांना नवी मुंबई पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवी मुंबई पोलिसांशी संपर्क केल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करा असं नवी मुंबई पोलिसांनी मेजर पुनिया यांना सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये