महाराष्ट्ररणधुमाळी

जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूरांचे मतदान होणार बाद?

मुंबई : (Jitendra Awhad and Ashomati Thakur fail on Voting) जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतांवर भाजपनं आक्षेप घेतला आहे. जितेंद्र आव्हाडांनी जयंत पाटलांच्या हातात मतपत्रिका दिल्याचा आरोप भाजपनं केला आहे. तर यशोमती ठाकूर यांनी नाना पटोलेंच्या हाती मतपत्रिका दिल्यानं भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी हा आक्षेप घेतला आहे.

मात्र, दोन्ही नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावत आपलं मत वैध असल्याचं सांगितलं आहे. या दोन्ही नेत्यांची मतं ग्राह्य धरली जाणार आहेत. अशी अधिकृत माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या तीन तर काॅंग्रेसच्या दोन आमदारांचे मतदान अद्याप बाकी आहे.

दरम्यान, आतापर्यंत २६० आमदारांनी मतदान केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात दाखल झाले आहेत. तर काँग्रेसच्या ४२ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये