प्रवीण तरडे ‘बिग बाॅस’मध्ये एन्ट्री करणार का?; महेश मांजरेकर म्हणाले, ‘पूर्ण घर डोक्यावर…”
मुंबई: सध्या टीव्हीच्या माध्यमातून अनेक कलाकार आपली ओळख निर्माण करत आहेत. सर्वांचा आवडता शो म्हणजे ‘बिग बॉस’(Bigg Boss) मराठी. हा शोअनेक जण आवडीने पाहतात. तर आता याचं ‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या पर्वाची चर्चा सुरु झाली आहे. टीव्ही विश्वातील सर्वात वादग्रस्त शो प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. ‘बिग बॉस’च्या घरात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत अनेक चर्चा रंगत असून प्रेक्षकांना स्पर्धकांमधील मैत्री, प्रेम, राडे, विविध टास्क ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वामध्ये पाहायला मिळतील. ‘ऑल इज वेल’ ही या नव्या पर्वाची थीम असणार आहे तर दिग्दर्शक-सुप्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकरच(Mahesh Manjrekar) या शोचे सुत्रसंचालक असणार आहेत. महेश मांजरेकारांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या पर्वामध्ये कोणते कलाकार असले पाहिजे? याबाबत चर्चा करताना मत मांडले.
तसंच हिंदी ‘बिग बॉस’ प्रमाणे मराठी ‘बिग बॉस’ हा शो चांगलाच चर्चेचा विषय ठरला असून मराठी ‘बिग बॉस’चं आधीच पर्व तर प्रचंड अविस्मरणीय झालं. मांजरेकर म्हणाले की, “सर्वात आधी तर ‘बिग बॉस’च्या घरामध्ये सगळ्यात जास्त धमाल करेल तो म्हणजे सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थनंतर दुसरा व्यक्ती या घरामध्ये धमाल करेल तो म्हणजे प्रवीण तरडे(Pravin Tarde) हे दोघं जर ‘बिग बॉस’मध्ये असतील तर पूर्ण घर डोक्यावर घेतील. त्याचप्रमाणे जितेंद्र जोशीदेखील घरामध्ये त्याच्या कवितांनी मैफिल रंगवेल. पण सिद्धार्थ-प्रवीण हा शो वेगळ्याच उंचीवर घेऊन जातील. तसंच सई ताम्हणकरलाही मला ‘बिग बॉस’च्या घरामध्ये पहायला आवडेल. कारण तिला कोणत्याच गोष्टी लपवता येत नाहीत तर तिच्या चेहऱ्यावर पटकन सत्य दिसून येतं. सईची हिच गोष्ट मला फार आवडते.” अशा शब्दात मांजरेकरांनी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये कोण असावं? याबाबत सांगितलं.
दरम्यान, 2 ऑक्टोबरपासून मराठी ‘बिग बॉस’चं नवं पर्व सुरु होत आहे. यामुळे हा शो पाहणाऱ्यांना ओढ लागली असून 2 ऑक्टोबर पासून सोमवार ते शुक्रवार, रात्री 10 वाजता आणि शनिवारी- रविवारी 9.30 वाजता फक्त कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे. पण आता नक्की कोणते स्पर्धक या शोमध्ये सहभागी होणार याबाबत सर्वाना 2 ऑक्टोबरला कळेलच.