ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मविआ सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेचं बंड!

मुंबई : काल पार पडलेल्या राज्यातील दहा जागांच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपनं मविआ ला धोबीपछाड करत आपले पाचही उमेदवार निवडून आणले. त्यानंतर मतं नेमकी कोणाची फुटली यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र, सकाळ पासून सेनेच्या एकनाथ शिंदेसह 35 आमदार असल्याची माहिती गुजरात भाजप नेत्यानं केली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, हे सर्व आमदार सुरत मधील एका हॉटेल डिमेरिअनमध्ये असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या हॉटेलला गुजरात सरकाराची डबल कवच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन लोटस होणार का? असा प्रश्न समोर आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. हे मात्र निश्चित मानलं जात आहे. शिंदे हे दुपारी 12 वाजता सुरत येथील हॉटेल डिमेरिअन मधून पञकार परिषद घेणार आहेत. त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

मात्र, ईकडे मविआची सर्व सुञ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या हाती घेतली आहेत. मविआच्या सर्व आमदारांची त्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये