ताज्या बातम्यामुंबई
Mumbai Fire News : कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, एका महिलेचा मृत्यू

मुंबई | मुंबईत पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळालय. मुंबईतील कुर्ला परिसरात एका इमारतीला आग लागली असून या आगीत 6 मजले आगीच्या भस्मस्थानी सापडले आहे. या आगीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहितीसमोर आली आहे. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चौथ्या मजल्यावर आग लागली असून ती इमारतीच्या 10 व्या मजल्यापर्यंत पसरली आहे. या आगीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहितीसमोर आली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.