क्राईमताज्या बातम्या

विद्यार्थी आणि शिक्षिकेचे जुळले प्रेम, आधी ठेवले शारीरिक संबंध अन् नंतर..

उत्तर प्रदेश | कोणताही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना चांगली शिकवण देतो, त्याला चांगल्या वाईटाची समज देतो, आयुष्यातील योग्य मार्ग दाखवतो. म्हणूनच आई-वडील आपल्या मुलांना मोठ्या विश्वासाने शाळेत किंवा कॉलेजात शिकण्यासाठी पाठवतात. मात्र, उत्तरप्रदेशमधील बागपत येथे शिक्षिका आणि विद्यार्थ्याच्या प्रेमप्रकरणा विचित्र घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिकेने आरोप केला आहे की, विद्यार्थ्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. मात्र तिने लग्नाचा तगादा लावताच त्याने लग्नास साफ नकार दिला. विद्यार्थी जम्मू-काश्मीर राज्यातील असून तो शिक्षिकेला धोका देऊन आपल्या घऱी निघून गेला. पोलिसांनी पीडित शिक्षिकेच्या तक्रारीनुसार आरोपी तरुणाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पीडितेने सांगितले की, ती हरियाणा राज्यातील रहिवासी आहे व गेल्या अनेक वर्षापासून बागपतमधील एका खासगी कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम करत आहे. तिचे लग्न झाले आहे, मात्र सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून तिने आपल्या पतीला घटस्फोट दिला आहे. ती एकटीच बागपतमध्ये भाड्याच्या घरात आहे.

दुसरीकडे जम्मू काश्मीरचा 21 वर्षीय विद्यार्थी पीडिता नोकरीला असलेल्या कॉलेजात शिकत आहे. काहि दिवसांपूर्वी शिक्षिकेचा त्याच्यावर जीव जडला. विद्यार्थीही तिच्यावर प्रेम करत होता. शिक्षिकेने आरोप केला आहे की, प्रियकर विद्यार्थ्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्तापित केले. मात्र आता त्याला लग्नाबद्दल विचारताच त्याने नकार देत आपला फोनही बंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिकेने विद्यार्थ्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला असून लवकरच आरोपी विद्यार्थ्याला अटक केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये