उत्साही कार्यकर्त्यांच्या ट्रेंडिंगचा व्हिडिओ; मात्र मोहोळ यांचा नकार!
पुणे | “जलने वालों को कह दो अब हम ट्रेंडिंग मे आ रहे है” अशा आशयाचा एक व्हिडिओ काही कार्यकर्त्यांनी काल इंस्टाग्राम वर टाकला आणि मोहोळ यांनी विरोधकांना इशारा दिल्याबद्दलच्या पोस्ट झळकू लागल्या. काहींनी तर संबंधित व्हिडिओ हा मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनीच पोस्ट केल्याबद्दलचे सांगितले. (Pune Loksabha Election)
काही काळानंतर हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला परंतु हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल झाला आणि एक वेगळीच चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात मुरलीधर मोहोळ यांनी हा व्हिडिओ टाकला नव्हता तसेच त्यांच्या अधिकृत कार्यालयाकडून अथवा यंत्रणा सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांकडून देखील अशा प्रकारच्या व्हिडिओ देण्यात आला नव्हता. त्यामुळे या पाठीमागे काहींचा खोडसाळपणा आहे का ? अशीही चर्चा आता सर्वत्र होत आहे. (Loksabha Election 2024)