शिवाजी पार्कात येऊन सावरकरांबद्दल अपशब्द काढाल तर.. मुंबईत जाण्यापूर्वी मनसेचा राहुल गांधींना इशारा
मुंबई | राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) आज महाराष्ट्रात (Maharashtra News) दाखल झाली आहे. आज महाराष्ट्रातील या यात्रेचा दुसरा दिवस आहे. मंगळवारी ही यात्रा नंदुरबारमध्ये (Nandurbar News) दाखल झाली, तर आज धुळे (Dhule News) आणि मालेगावचा (Malegaon) टप्पा पार करणार आहे. त्यानंतर 17 मार्चला मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सभा होणार आहे.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कुठलेही अपमान जनक वक्तव्य केल्यास राहुल गांधीना महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याया यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) महाराष्ट्रात दाखल झाली आहे. तसेच येत्या 17 मार्चला या यात्रेचा समारोप होणार असून, काँग्रेसच्या (Congress) भव्य यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये भव्य सभेनं होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी हा इशारा दिला आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, “ छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये आतापर्यंत अनेक वाघांच्या डरकाळ्या या मैदानाने ऐकले आहेत. स्वतंत्र वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे या दिग्गजानी शिवाजी पार्क मैदानावर सभा घेतल्या असून, त्यांच्या डरकाळी अनेकांनी ऐकले आहेत. मात्र, 17 तारखेला होणाऱ्या सभेमध्ये काँग्रेसच्या कोल्ह्यांची कुई कुई ऐकण्याचे दुर्भाग्य महाराष्ट्राला राबणार आहे. त्याचबरोबर वाघाचं कातडे पांघरलेले लांडगे सुद्धा या सभेला असतील. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, असेही देशपांडे म्हणाले.
अन्यथा महाराष्ट्रात त्यांची काही खैर ना….
छत्रपती शिवाजी पार्क मैदान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आहे. शिवाजी पार्क जवळच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे घर आहे. तुम्ही महाराष्ट्रात येत आहे, तुमचं म्हणणं मांडा, आमचं याला ना नाही. पण इथे येऊन मागच्या वेळीप्रमाणे सावरकरांबद्दल कुठलंही अपमान जनक वक्तव्य केल्यास, महाराष्ट्रातील 14 कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तसेच या कोल्ह्यांबरोबर सामील झालेले जे हे लांडगे आहे, त्यांनी पण लक्षात ठेवावं. अन्यथा महाराष्ट्रात त्यांची काही खैर नाही, असे देशपांडे म्हणाले.