ताज्या बातम्यादेश - विदेश

‘What’s Wrong With India?’ या भारत विरोधी ट्रेंडची सगळीकडे का होते चर्चा?

what’s wrong with India : सोशल मीडियावर मंगळवारी(12 मार्च) एक्स म्हणजेच पूर्वीच्या ट्विटरवर ‘What’s Wrong With India?’ हा ट्रेंड सुरु होता. त्याच दिवशी सायंकाळपर्यंत 2.5 लाखपेक्षा जास्त पोस्ट शेअर झाल्यानंतर हा हा हॅशटॅग चर्चेत आला. सुरुवातीला या ट्रेंडचा वापर करून भारतावर टीका करणाऱ्या पोस्ट केल्या जात होत्या. पण त्यानंतर मात्र भारतीय नेटकऱ्यांनी याच ट्रेंडचा वापर करून भारताच्या समर्थनार्थ मजकूर लिहायला, इतर देशांमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांचा प्रचार करायला सुरूवात केली.

https://twitter.com/Anup_soni_100/status/1767374874325160331?s=20
https://twitter.com/FunMauji/status/1767459640789569589?s=20
https://twitter.com/ArtofWenger/status/1767475151485251671?s=20

‘what’s wrong with India’ हा हॅशटॅग का होतोय ट्रेंड?

साधारण दहा दिवसांपूर्वी झारखंडमधील दुमका येथे एका स्पॅनिश पर्यटक महिलेवर सात जणांनी सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे सोशल मीडियावर प्रचंड संताप निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी भारतात प्रवास करताना त्यांच्याबरोबर घडलेले वाईट अनुभव सांगितले.मात्र, काहींनी ही संधी साधून भारताच्या प्रतिमेवर चिखल फेक केली आणि अशा घटना देशात रोजच्याच घडत असल्याचा आरोप केला भारताला “जगातील बलात्काराची राजधानी” अशी खिल्ली उडवणाऱ्या अशा अनेक पोस्ट्स एका आठवड्यात शेअर करण्यात आल्या. . इतकेच नाही तर या पोस्ट्सनी सार्वजनिक स्वच्छता आणि संस्कृतीशी संबंधित रूढीवादी विचारांना प्रोत्साहन दिले. यातील अनेक पोस्ट्समध्ये ‘what’s wrong with India’ अशा शब्दात शेअर करण्यात आली होती. भारतातील काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी दावा केला की, या पोस्ट्सला खूप जास्त महत्त्व दिले जात आहे आणि त्यासाठी X च्या अल्गोरिदमला दोष दिला आहे.

मंगळवारी अनेकांनी हा हॅशटॅग वापरून अनेक पोस्ट केल्या अनेक या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. सोशल मीडियावर काहींनी इतर देशांमध्येही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असेच अनुभव आल्याचे सांगितले आणि कॅप्शनमध्ये ‘what’s wrong with India’ हा हॅशटॅग वापरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये