महाराष्ट्ररणधुमाळी

‘तुम्ही तुमच्या घरात बसून घरच्यांसाठी अल्टिमेटम द्या’ ; अजित पवार

मुंबई: सध्या राज्यभर मशिदीवरील भोंगे प्रकरणावरून सर्वत्र तणावाचं वातावरण झालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पर्यंत भोंगे हटवा नाहीतर आम्ही हनुमान चालीसा वाजवू असा इशारा देत अल्टिमेट दिला होता. त्याचे काल पासून सर्वत्र पडसाद दिसून येत आहेत. तर यातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

अजित पवार म्हणाले की, कुणीही कायदा हातात घेऊ नका. कायदा सर्वांना सारखा आहे , सर्वांना कायद्याचं सारखं पालन करावं लागणार आहे. ”तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर घरात बसून घरच्यांसाठी द्या, आम्हाला सांगू नका” असा टोला त्यांनी राज ठाकरे लगावला आहे. तसंच गृहखात्याने पोलिसांना राज्यात तणावाचं वातावरण निर्माण होणार नाही यासाठी योग्य सूचना दिल्या आहेत. सर्वानी सरकारला आणि पोलिसांना सहकार्य करावं असं ही पवार म्हणाले.

याचप्रमाणे २००५ साली सुप्रीम कोर्टाने आवाजाची मर्यादा किती असावी हे सांगितलं आहे यानुसार त्याच पालन करावं कोणीही कायदा हातात घेऊ नका . ज्यांनी अजूनही अजूनही ज्या मंदिरांच्या आणि मशिदीच्या भोंग्यांना परवानगी घेतलेली नसेल त्यांनी ती कायदेशीररित्या काढून घ्यावी.सर्व धार्मिक स्थळांना नियम हे सारखेच आहेत असंही अजित पवारांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये