महाराष्ट्र

“आम्ही काही साधुसंत नाही…., तर पवारांची औलाद नाही”: अजित पवार

अहमदनगर: कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी आयोजित केलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. त्यावेळी ‘आम्ही काही साधूसंत नाही, माणसंच आहोत. तरीही आम्ही कामं करतो आणि त्यावरून मतं मागतो. आता जी काही आश्वासनं दिली, ती पुर्ण करून दाखवणारच. नाही केली तर पवारांची औलाद सांगणार नाही. मात्र, त्याबदल्यात आम्हाला मताधिक्य देण्याची धमक तुम्ही दाखवणार का? घोडामैदान जवळच आहे, पाहू जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तुम्ही काय दिवे लावता?’ असं आव्हान त्यांनी कोपरगांव च्या जनतेला केलं.

पवार यांच्या हस्ते आज कोपरगाव आणि शिर्डी येथील विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. याशिवाय आमदार काळे यांनी केलेल्या अनेक मागण्याही त्यांनी मान्य केल्या. त्यासाठीच्या निधीचीही घोषणा केली.त्यानंतर ते म्हणाले, ‘आम्ही एवढी कामं करतो, तेव्हा तुमच्याकडून मतांची अपेक्षा ठेवतो. आम्ही दरवेळी आमच्या मतदारसंघातून लाखांच्या मताधिक्यानं निवडून येत असतो. मात्र, तुलनेत तुम्ही येथे काळे यांना दिलेलं मताधिक्य कमी आहे. पुढीलवेळी ते वाढलं पाहिजे. आम्ही काही साधूसंत नाही, माणसंच आहोत. आम्ही कामं करतो, तुम्ही मताधिक्य द्या,’ असं आवाहन पवार यांनी कोपरगाव च्या लोकांना केलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये