हिस्टाॅरिकलफिचरराष्ट्रसंचार कनेक्ट

चला सिंहगडावर

सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोणजे गावामध्ये आहे. सिंहगड हा किल्ला पुण्यापासून ३० ते ३५ किलोमीटर आहे आणि मुंबईपासून हा किल्ला १८० किलोमीटर आहे. सिंहगड हा किल्ला मध्यम चढाई श्रेणीचा असून, हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे आणि हा सह्याद्रीच्या डोंगरावरील भुलेश्वर रांगेवर हा गड विस्तृत आहे. या गडाची उंची समुद्रसपाटीपासून ४४०० फूट उंच असून या किल्ल्यावरून लोहगड, राजगड, पुरंदरविसापूर हे भाग देखील दिसतात. सिंहगड या किल्ल्याला पूर्वीच्या काळी कोंढाणा या नावाने ओळखले जायचे आणि हा किल्ला महाराष्ट्रामधील यादव किंवा शिलाहार यांनी बांधला असावा, असे काही इतिहासकारांच्या मते म्हटले जाते.

सिंहगड हा किल्ला मराठा साम्राज्याचा गौरव म्हणून ओळखला जाणारा किल्ला आहे. मुहम्मद तुघलक याच्या काळामध्ये हा किल्ला नागनायक राज्याच्या ताब्यात होता. त्यानंतर या किल्ल्यावर अहमदनगरचा संस्थापक मलिक अहमद आणि विजापूरचा सुलतान यांनी या किल्ल्यावर वर्चस्व मिळवले. त्याचबरोबर ह्या किल्ल्यावर आदिलशाहीचे देखील वर्चस्व होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले जे मराठा नेते होते पहिला इब्राहिम आदिलशहाचे सेनापती होते आणि त्यांना पुणे हा प्रांत ताब्यात देण्यात आला होता, पण छत्रपती संभाजी महाराजांना आपले वडील आदिल शहा समोर झुकतात आणि त्यांना नमन करतात हे आवडत नव्हते म्हणून त्यांनी आपले एक स्वतंत्र स्वराज्य स्थापण्याचा विचार केला आणि त्यांनी आदिलशहाचा सरदार सिद्दी अंबर याला आपल्यामध्ये मिळवून घेवून कोंढाणा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. पण १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले.
त्याने अशी अट घातली कोंढाणा किल्ला जर आमच्या ताब्यात दिला तर आम्ही शहाजीराजांना सोडू आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना कोंढाणा हा किल्ला आदिलशहाला परत द्यावा लागला. या किल्ल्यावर १६६२ ते १६६५ मध्ये मुघलांनी हा किल्ला मिळवण्यासाठी हल्ले केले आणि हा किल्ला १६६५ मध्ये मुघल सेनेचे प्रमुख मिर्झाराजे जयसिंग यांच्या हाती हा किल्ला गेला, पण त्यावेळी शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे आणि मावळ्यांनी मुघल सैनिकांशी लढाई करून हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला.

तानाजी मालुसरे लढाई

सिंहगड हा एक पहाडी किल्ला आहे जो महाराष्ट्रातील पुण्यापासून ३० ते ३५ किलोमीटर लांब आहे. पूर्वी असे म्हटले जायचे की, हा किल्ला ज्याच्या ताब्यात असेल त्याकडे पुणे शहरावर वर्चस्वदेखील असेल. सिंहगड या किल्ल्यावर खूप लढाया झाल्या. त्यामधील विशेष म्हणजे १६७० मधील सिंहगड लढाई. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते की, हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेण्याचे आणि त्यांनी यासाठी तानाजी मालुसरे या सरदाराला निवडले.

कोंढाणा किल्ला माहिती

सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा होते. निक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकानुसार कौंडण्य ऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा ठेवण्यात आले होते. याच किल्ल्याचे आताचे नाव सिंहगड हे आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपणीचे मित्र आणि स्वराज्यातील शिवाजी महाराजांचे सरदार म्हणजे तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी या किल्ल्यावर वर्चस्व असणार्‍या मुघल सत्तेशी युद्ध झाले त्यावेळी त्यांनी किल्ला जिंकला,
पण त्यांना त्या लढाईमध्ये वीरमरण आले आणि ही बातमी शिवाजी महाराजांना समजताच ते म्हणाले, गड आला पण सिंह गेला. अशाप्रकारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे कोंढाणा हे नाव बदलून सिंहगड असे ठेवले.

गडावर पाहण्यासारखी ठिकाणे

कोंढाणेश्वर मंदिर : कोंढाणेश्वर मंदिर हे शंकराचे मंदिर आहे. जे यादवांच्या काळामध्ये बांधले होते, कारण हे त्यांचे कुलदैवत होते आणि हे मंदिर आपल्याला आजदेखील गडावर पाहायला मिळते.
तानाजी कडा : तानाजी कडा जेथून तानाजी मालुसरे आपल्या सैनिकांना घेऊन चढले होते. हा कडा आपल्याला गडाच्या पश्चिमेच्या भागामध्ये पाहायला मिळतो.
तानाजी स्मारक : या किल्ल्यावर तानाजींची कीर्ती आणि स्मृती अखंड राहावी म्हणून एक स्मारक बांधले आहे. जे आपल्याला अमृतेश्वरच्या मागच्या बाजूने वर गेल्यास डाव्या बाजूस दिसते.
देवटाके : देवटाके हे एक पाण्याची टाकी आहे. ज्याचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी होतो. देवटाके हे तानाजी स्मारकाच्या मागच्या डाव्या बाजूस आपल्याला पाहायला मिळते.
अमृतेश्वर मंदिर : हे एक गडावरील प्राचीन मंदिर आहे. जे कोंढाणेश्वर मंदिराच्या पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूस आपल्याला पाहायला मिळते. भैरव आणि भैरवी अशा दोन मूर्ती या अमृतेश्वर मंदिरामध्ये पाहायला मिळतात.
राजाराम स्मारक : या किल्ल्यावर राजाराम महाराजांचे निधन झाले होते आणि म्हणूनच या गडावर त्यांचे स्मारक उभारण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये