निवडणूक झाली आता महत्त्वाच्या विषयांना अग्रक्रम देऊ ; अजित पवार
![निवडणूक झाली आता महत्त्वाच्या विषयांना अग्रक्रम देऊ ; अजित पवार ajit pawar 2](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/ajit-pawar-2.jpg)
पुणे : आज उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला . याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीने एकत्र काम केल्याने चांगले यश मिळाले असल्याचं म्हंटलं . पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघनिहाय राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते माध्यमाशी बोलत होते. तसेच या कोल्हापूर निवडणुकीनंतर आमची जबाबदारी वाढली आहे, प्रचारादरम्यान कोण काय बोलले याच्या खोलात न जाता, राज्यातील विजेची मागणी, उन्हाळ्यामुळे निर्माण होणारी पाणी टंचाई यास अग्रक्रम देऊन काम केले जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार असं त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं .
तसेच अजित पवारांनी भाजपवर जोरदार टीका सुद्धा केली कि, कोल्हापूर निवडणुकीत काही वेगवेगळे विषय घेऊन राजकारण करण्यात आलं,समाजात तेढ निर्माण करून मत मिळविण्याचा प्रयत्न झाला परंतु शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात त्याला थारा मिळाला नाही असेही अजित पवार म्हणाले . याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून ही जागा काँग्रेससाठी सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला.तर निवडून आलेल्या जयश्री जाधव यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे, आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू.
महाराष्ट्रातील विजेची वाढती मागनी , पाणी टंचाई अशा इतर महत्त्वाच्या विषयांना अग्रक्रम देऊन काम करणार आहोत. शेवटी निवडणुकीत एका मताने जिंकू किंवा लाख मताने जिंकू एकदा जिंकून आल्यानंतर शेवटी त्यांना त्या भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते त्या संधीचा उपयोग लोकांच्या हितासाठी व्हावा असं हि त्यांनी म्हंटलं .