भाजप-शिंदे गटात वाद! भाजप नेत्यानं मंत्री सामंतांसह भुसेंना सुनावलं; म्हणाले, “तुम्हाला पद भाजपमुळं…”

मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतानाच आता शिंदे गटातील आणि भाजपमधील नेत्यांच्या कुरबुरी समोर येत आहेत. ‘नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि उद्योगमंत्री उदय सामंत आठवण करुन देतो की, त्यांची पदं भारतीय जनता पक्षामुळे आहेत.’ अशा शब्दात भाजपचे सह-मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी भुसे आणि सामंत यांना सुनावलं आहे.
यासंदर्भात अजित चव्हाण यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात सध्या शिंदे गट-भाजप यांचं सरकार आहे. मात्र हे सर्व भाजपच्या पाठिंब्यामुळे असल्याची आठवण भाजपच्या या नेत्याने कॅबिनेट मंत्र्यांना करून दिली आहे. या घटनेमुळे शिवसेना-भाजप यांच्यातील कुरूबुरी आता चव्हाट्यावर आल्या आहेत.

नाशिकमध्ये काल औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला. हा उद्घाटन सोहळा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमावेळी भाजपच्या आमदार सीमाताई हिरे यांना एका व्यक्तीचा धक्का लागून त्या खाली पडल्या. मात्र, ज्या व्यक्तीचा धक्का लागल्याने त्या पडल्या त्या व्यक्तीने किंवा त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या कोणत्याही नेत्याने या घटनेची दखल घेतली नाही. यानंतर सीमाताई हिरे त्या कार्यक्रमातून निघून गेल्या