फुड फंडाफिचर

स्पेशल मिसळसाठी… फक्त “अतिथी मिसळ हाऊस”

मिसळचं नाव जरी ऐकलं तरी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. मग त्यामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला चमचमीत, तिखट, तर्रीदार अशा मिसळचा आस्वाद घ्यायला आवडतं. अशाच मिसळप्रेमींसाठी प्रोप्रा. गणेश कुदळे यांचं ‘अतिथी मिसळ हाऊस’ हे १९९५ पासून प्रसिद्ध आहे. ‘अतिथी मिसळ हाऊस’ हे महात्मा फुले कॉलेजसमोर, पिंपरीगाव, पुणे-४११०१७ येथे आहे. विशेष म्हणजे या मिसळ हाऊसचं नाव जरी काढलं तरी प्रत्येक मिसळप्रेमीला आठवतो तो तिखट रस्सा, झणझणीतपणा, त्यावर असलेली लाल तर्री, लिंबू, कोथिंबिरीनं सजवलेली आणि लगेच तोंडाला पाणी सुटणारी तर्रीची मिसळ.

यामुळेच प्रसिद्ध अतिथी मिसळ हाऊसने आजही पुण्यात येणार्‍या प्रत्येक मिसळप्रेमींना भुरळ घातली आहे. त्याचबरोबर अतिथी मिसळ हाऊसची २७ वर्षांची परंपरा अजूनही अजरामर असून हे मिसळ हाऊस खव्वयांच्या पसंतीचे बनले आहे.
‘अतिथी मिसळ हाऊस’ यांची स्पेशल मिसळ-पाव ही स्पेशालिटी आहे. याचप्रमाणे बटाटाभजी, वडापाव, सोलकडी यांसारखे असे अनेक पदार्थदेखील त्यांची खासियत आहे. तसेच येथील मिसळची चव आणि स्वाद अप्रतिम असल्याने खवय्यांना पुन्हा पुन्हा येथे येण्याचा मोह होतो. त्याचबरोबर या मिसळvहाऊसमध्ये मिसळसोबतच तिथे कॉफी, फक्कड असा चहा, कोल्ड्रिंक्स असे पेयदेखील मिळतात.

विशेष सांगायचं झालं, तर या मिसळ हाऊसमध्ये मिळणारी स्पेशल मिसळ आणि अन्य पदार्थ प्रत्येकाच्या खिशाला परवडणारे आहेत. सोबतच या मिसळ हाऊसचे आदरातिथ्य खवय्यांना पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडते, तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना घेऊन पार्टी करण्यासाठी, फॅमिलीसोबत या चमचमीत मिसळचा आणि अन्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नक्की भेट द्या पिंपरीगाव येथील अतिथी मिसळ हाऊसला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये