मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचावी ; रवी राणा

मुंबई : राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढा अशी भूमिका घेल्यानंतर आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे याना आव्हान केलं . मुख्यमंत्र्यांनी उद्या मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचावी. जर त्यांनी उद्या हनुमान चालिसेचं पठण केलं नाही तर आम्ही स्वतः मातोश्रीबाहेर हनुमान चालिलिसेच पठण करू असा इशारा हि रवी राणा यांनी दिला आहे.
तसेच उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि दिशा विसरले असतील तर आम्ही खासदार आणि आमदार मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करू घेऊ ,असं रवी राणा म्हणाले.याचप्रमाने ते बाळासाहेब ठाकरेंचे विचार विसरले असून ते दुसऱ्या दिशेने भरकटले आहेत त्यांना बाळासाहेबांच्या विचारावर चालून राज्याला दिशा दयावी असं हि रवी राणा म्हणाले .
यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे . त्याच्या या आव्हानांवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हि प्रतिकिया दिली कि,तुम्ही हनुमान चालीसा वाचा, आम्ही इंधन दरवाढीबद्दलची हनुमान चालीसा वाचणार आहोत. गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरासंदर्भात चालीसा वाचणार आहोत. दादरमध्ये गोल मंदिरात पठण करण्यासाठी रवी राणा यांनी याव असं किशोरी पेडणेकर यांनी म्हंटलं