ताज्या बातम्यापुणेरणधुमाळी

मोहोळांच्या होम पिचवर धंगेकरांच्या सेल्फीसाठी झुंबड

Loksabha Election 2024 : पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज सकाळी कोथरूड परिसरामध्ये प्रभात फेरी काढली. भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे होम पीच असलेल्या या विभागात विविध उद्यानांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी अनेकांनी रवींद्र धंगेकर यांच्यासोबत सेल्फी काढण्यास गर्दी केली असल्याचे चित्र दिसत होते.

प्रभाग क्रमांक १३ मध्ये डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यान आणि शहीद मेजर ताथवडे उद्यान तसेच डी. पी रोड येथे आज सकाळी जाऊन सकाळी व्यायामासाठी अथवा फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या या भेटीला नागरिकांनी उत्स्फूर्त मोठा प्रतिसाद दिला, अनेकांनी सेल्फी काढले ‘कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला तसा विजय या निवडणुकीतही आपण मिळवाल’ असा विश्वास अनेक नागरिकांनी व्यक्त केला. ‘रविंद्र धंगेकर यांच्यासारखा सर्व्वांना सोबत घेऊन जाणारा कार्यक्षम उमेदवार पुण्याचा खासदार बनला तर पुण्याच्या विकासाला नवी दिशा व गती मिळेल’ असे मत या प्रसंगी अनेकांनी व्यक्त केले.

या प्रसंगी रविंद्र धंगेकर यांनी जेष्ठ व्यक्तींकडून आशीर्वाद घेतले त्यांच्या सोबत माजी नगरसेवक शिवा मंत्री, माजी नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम, विजय खळदकर, भगवान कडू, उमेश कंधारे, अण्णा गोसावी, रवींद्र माझिरे, संदीप मोकाटे, अभिजीत मोरे आणि प्रा पवार सर, प्रशांत वेलणकर, नितीन पळसकर, राजेश पळसकर, कानू साळुंके, अजित ढोकळे, आशिष व्यवहारे, सौ मनीषा करपे ,सौ शारदा वीर, शेखर साळुंखे, दिनेश पेंढारे, कृष्णा नाकते, राजा साठे, विवेक कडू आदी सुमारे शंभर कार्यकर्ते या प्रसंगी सहभागी झाले होते.

या परिसरात राहणाऱ्या जेष्ठ प्रतिष्ठीत नागरिकांच्या भेटी देखील रवींद्र धंगेकर यांनी घेतल्या बाळासाहेब लांडगे, शरद निंबाळकर, शांताराम जाधव बाळासाहेब शिंदे अशा अनेकांच्या वयक्तिक गाठी भेटी देखील रवींद्र धंगेकर यांनी घेतल्या ‘ नागरिकांचा मिळत असलेला मोठा प्रतिसाद बघून मी भारावून गेलो आहे’ अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली.



Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये