मनोरंजन

शहनाजच्या ‘मेरा पिँड मेरे खेत’ पोस्टला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद

‘मेरा पिँड मेरे खेत’ असं कँप्शन देत प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिलने बुधवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला एक व्हिडीओ शेअर केलाय. तिच्या पंजाबी सूटमधील हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होऊन प्रेक्षकांकडून याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या पोस्ट केलेल्या व्हिडीओला वीस तासांत तब्बल सात लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

बिग बॉस पासून प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिल ही इंस्टाग्राम वर सतत सक्रिय असते. चाहत्यांना तिच्या इंस्टाग्राम पोस्ट मधून सतत अपडेट्स देते. कालही तिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड केलाय. ज्यामधे पिंडमधील (पंजाबमधील) शेतांमधे ती दिसून आली. ट्रॅक्टर,विटांची घरं दाखवत तिने पंजाबचे म्हणजेच तिच्या राहत्या ठीकाणचे वर्णन ‘मेरा पिँड मेरे खेत’ अशा शब्दांत केले आहे. चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात विरळ केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये