अमित शहा बालंबाल बचावले! ‘रोड शो’दरम्यान नेमकं काय घडलं?

जयपूर | सध्या राजस्थानात सत्ताधारी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. स्टार प्रचारकांच्या सभा, रॅलींना सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी प्रचारासाठी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पोहोचले. त्यावेळी भाजपच्या प्रचार रथाची वरील भाग विजेच्या तारेच्या संपर्कात आला. सुदैवानं अमित शहा थोडक्यात बचावले आहेत.
नेमकं काय घडलं ?
केंद्रीय मंत्री अमित शहांचा ताफा बिदियाद गावातून परबतसरच्या दिशेनं जात होता. एका गल्लीतून ताफा जात होता. गल्लीच्या दुतर्फा दुकानं आणि घरं होती. त्यावेळी रथाचा वरचा भाग तारेच्या संपर्कात आला. त्यामुळे स्पार्किंग झालं. विजेची तार रस्त्यावर पडली. त्यानंतर रथामागील अन्य वाहनं लगेचच थांबली. वीज पुरवठा तातडीनं खंडित करण्यात आला. त्यामुळे जीवितहानी टळली. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
https://x.com/chhavi_avasthi/status/1721894539710046486?s=20
यानंतर अमित शहांना दुसऱ्या वाहनातून परबतसरला नेण्यात आलं. तिथे त्यांनी रॅलीला संबोधित केलं. या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना त्यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली.