ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

राज्यात दिव्यांग मंत्रालय लवकरच होणार : आमदार बच्चू कडू

पुणे | Bacchu Kadu – राज्यात दिव्यांग मंत्रालय लवकरच होणार असून याबाबत सरकारनं घोषणा देखील केली आहे. यावर प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांना या मंत्रायलाचे मंत्री होणार का? असं विचारल असता ते म्हणाले की, झालो तर त्याच्यासारखा आनंद नाही. दिव्यांगाचा एक कार्यकर्ता आंदोलन करता करता मंत्रीपदावर जाईल. आणि पहिलं मंत्रिपद मिळालं तर आनंद द्विगुणित होईल, असंही आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले.

पुण्यातील एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘संवाद’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अर्हम फाउंडेशन व वास्तव कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने “संवाद स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी” हा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) ,सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), बच्चू कडू अति मान्यवर उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

एमपीएससी विद्यार्थ्यांची दोषमुक्त प्रश्नपत्रिका असली पाहिजे. ही या मुलांची अत्यंत महत्त्वाची मागणी आहे. परीक्षेला विलंब लागू नये. पारदर्शक पद्धतीनं परीक्षा व्हाव्या,अशी मागणी या मुलांनी केली आहे.आणि यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. आणि एक चांगला निर्णय घेण्यात येणार आहे, असं यावेळी कडू म्हणाले.

दिव्यांग मंत्रालय जाहीर झालं आहे. पण अजूनही मंत्रिमंडळाबाबत चर्चा नाही यावर कडू यांना विचारल असता, ते म्हणाले की दिव्यांगांच्या प्रश्नासमोर ही खूप लहान गोष्ट आहे.आत्ता जे काही वंचित आहेत त्यांचा विकास झाला पाहिजे, असंही कडू म्हणाले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज जे वक्तव्य केलं आहे त्याबाबत कडू यांना विचारलं असता ते म्हणाले की, संजय राऊत यांचं म्हणणं काही प्रमाणात योग्य असतं. महापुरुषांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे बोलणं योग्य नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. सगळ्याच गोष्टीत कारवाईची शक्यता नसते. ज्याला त्याला समजलं पाहिजे. स्वतःला जनाची नाही तर मनाची असली पाहिजे आणि याचा विचार त्यांनी केला पाहिजे असं कडू यांनी म्हटलं आहे.

राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे एकत्र येणार आहेत यावर कडू यांना विचारलं असता ते म्हणाले, कितीही शक्ती एकत्र आल्या तरी जनशक्तीसाठी तुम्ही काय केलं? दिव्यांगांसाठी आम्ही दहा वेळा गेलो, एकदाही मीटिंग झाली नाही. लोकांबाबत जर मनात आस्था नसेल अशा शक्त्या एकत्र येऊन काय होणार नाही. असा टोला कडू यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये