ताज्या बातम्यारणधुमाळी

नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच, सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली; म्हणाले, “राज्यकर्ते रेड्यांची औलाद…”

पुणे | Sadabhau Khot – मागील काही दिवसांपासून अनेक नेते वादग्रस्त विधान करत असल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात होता. अशातच काल (30 नोव्हेंबर) सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनीही शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यादरम्यान, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचीही जीभ घसरली आहे. राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य खोत यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात सुरु असलेल्या वादात नव्यानं भर पडली आहे.

पुण्यातील एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘संवाद’ या कार्यक्रमात सदाभाऊ खोत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. राज्यकर्त्यांना डोक्याची भीती वाटत असते. कारण जिकडे जास्ती डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात. राज्यकर्ते बोलायचे असतील तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखं रेड्याच्या पाठीवर हात ठेवावे लागतील. कारण राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असते. त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय ते बोलत नाहीत. अशा शब्दांत खोत यांनी राजकीय नेत्यांवर टीका केली आहे.

एखादा मंत्री बोलतो तेव्हा त्याचा व्हिडीओ झालेला असतो. मला वाटतं अधिवेशन घ्या आणि मंत्र्यांना बोलवा. संघटीत होऊन प्रश्न सोडवावे लागतील. सगळ्या मजल्यावर बसलेले अधिकारी ड्राफ्ट तयार करत असतात. मी मंत्री राहिलो आहे. आम्ही फक्त वाचतो आणि ते सांगतील तसं सही करतो. 50 टक्के मंत्र्याचं काम हा अधिकारीच करत असतो. म्हणून मला वाटतं तुम्ही सगळे संघटीत राहा, असही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये