राणेंना काय मिळालं? प्रमोद सावंतांची मोठी खेळी…

पणजी : गोवा मंञीमंडळात प्रमोद सावंत यांनी गृह, अर्थ खाते स्वतःकडे ठेवून, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आसणार्या विश्वजीत राणे यांना माञ दुय्यम दर्जेचे खाते देऊन मोठी राजकीय खेळी केली आहे. त्यांच्याकडे आरोग्य, नगरविकास, नगरनियोजन, वन, महिला व बालकल्याण या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
आठवडाभरापूर्वी गोवा राज्यात मंञीमंडळात शपथविधी सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत अनेक केंद्रीय मंञी व इतर भाजप शासित राज्यातील मंञी, व नेते मंडळी उपस्थित होते.
काँग्रेस मधून भाजपमध्ये दाखल झालेल्या राणे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात येईल असे वाटत आसताना ते प्रमोद सावंत यांना देण्यात आले. कमीत कमी गृह, अर्थ हे खाते तरी मिळेल अशा मानसिकतेत आसणार्या विश्वजीत राणे सावंत यांनी दुय्यम दर्जेचे खाते देऊन अखेर निराशाच मिळाली.

