मोदींपेक्षा; राहुल गांधींना लाइक्स, रिट्विटस आणि कोट्स रिट्विट जास्त

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जेवढे ट्विटर फॉलोअर्स आहेत, तेवढे भारतात कोणाचेही नाहीत. मोदींचे ७७.८ दशलक्ष ट्विटर फॉलोअर्स आहेत. तर राजकिय विरोधक आसलेल्या राहुल गांधीं यांच्या फॉलोअर्सची संख्या २०.४ दशलक्ष एवढी आहे. मोदींच्या फॉलोअर्सची संख्या चौपट असूनही राहुल गांधींना लाइक्स, रिट्विटस आणि कोट्स रिट्विट मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. राहुल गांधींना मोदींच्या तुलनेत ट्विटरवर तिप्पट प्रतिसाद मिळला. गेल्या २०१९ -२१ मधील ट्विटवरून केलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.
मोदी आणि गाधींनी १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२१ मध्ये केलेल्या ट्विट्चा रिट्विट वगळून अभ्यास करण्यात आला. यावेळी सकारात्मक, नकारात्मक आणि तटस्थ अशा प्रकारचे ट्विट केलेले आढळून आले. तसेच फक्त सांख्यिकीय अभ्यास न करता ट्विटरच्या नवीन धोरणाचा दोन्ही नेत्यांच्या ट्विटर प्रतिसादावर कसा परिणाम झाला? याचा देखील अभ्यास यामध्ये करण्यात आला.
विशेष म्हणजे, २०१९-२१ मध्ये राहुल गांधींना ट्विटरवर चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी कोरोना व्यवस्थापन, स्थलातंरीत कामगारांचं संकट, शेतकरी आंदोलनावरून सरकारवर टीका केली होती. या ट्विटला सर्वोत्तम प्रतिसाद मिळाला. पण, ट्विटरच्या बदलेल्या धोरणाचा त्यांना मोदींपेक्षा जास्त फटका बसला. यामुळे मोदींचे फॉलोअर्स जरी जास्त आसले तरी, गांधींचे लाइक्स जास्त आहेत हे माञ नक्की.