लखीमपूर खेरी प्रकरण- केंद्रीय गृह राज्यमंत्र्याच्या मुलाचे आत्मसमर्पण

नवी दिल्ली : लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडून हत्या केलेल्या केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांनी आज आत्मसमर्पण केले. उच्च न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करून, १८ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आठवडाभरात आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. आशिष यांची पुन्हा लखीमपूर खेरी कारागृहात रवानगी केली आहे. खंडपीठासमोर चालवण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली होती. असा आदेश देणे योग्य होणार नाही, असे सरन्यायाधीश म्हणाले.
मागिल वर्षी ऑक्टोबर २०२१ मध्ये शेतकरी आंदोलकांना लखीमपूर खेरी येथे चिरडल्याची घटना घडली होती. यामध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर खुनासह अनेक गंभीर कलमांत गुन्हा दाखल करण्याबरोबरच तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. आशिष मिश्रा यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवत म्हटले की, पीडितांना सर्व स्तरांवर सुनावणी घेण्याचा अधिकार आहे. या प्रकरणात पीडितेला सुनावणीचा अधिकार नाकारला आहे. अनेक असंबद्ध तथ्य आणि न पाहिलेली उदाहरणे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता.