आरोग्य

पीएमएस या आजाराला वेळीच ओळखा व त्वरित उपाय करा!

डॉ. ईश्वरी जोशी नानोटी, (एमडी) होमिओपॅथी मेडिसीन्स

पीएमएस म्हणजेच पाळी येण्यापूर्वी होणारा त्रास. पीएमएस किंवा मासिक पाळी आधीचा सिंड्रोम म्हणजे मासिक पाळी आधी स्त्रियांनी अनुभवलेली शारीरिक व मानसिक लक्षणे होय. या आजाराची तीव्रता वयानुसार, वातावरणानुसार आणि काही हार्मोनल प्रॉब्लेममध्ये कमी किंवा जास्त होऊ शकते.

पी एमएसमुळे स्त्रिया अनेक लक्षणे अनुभवू शकतात. ही लक्षणे दोन प्रकारची असतात. शारीरिक व मानसिक. शारीरिक लक्षणांमध्ये पोट फुगणे, हृदयात जळजळ, डायरिया किंवा अतिसार, खाण्याची तीव्र इच्छा, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, स्तनांचे दुखणे, पोटरी दुखणे, पाठदुखी, वात आढळून येतात. मानसिक लक्षणांमध्ये अस्वस्थता, चिडचिड, गोंधळ, लक्ष केंद्रित करण्यात अडथळे, चिंता, नैराश्य, मूड्समध्ये बदल, झोप न येणे.

सर्व स्त्रियांना सर्व लक्षणे जाणवतील असे नाही. या आजाराच्या मागचे कारण असे निश्चित अजूनही उलगडले नाही. पण स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते, जसे की स्थूल असलेल्या स्त्रिया, ज्या स्त्रियांना पहिलेच कुठलातरी हार्मोनल प्रॉब्लेम आहे अशा निकृष्ट दर्जाचा आहार घेणार्‍या स्त्रिया आणि खूप महत्त्वाचे ताणतणाव आहे अशा स्त्रिया. या आजाराचे निदान करायला कोणत्या टेस्ट करायची गरज नाही.

योग्य डॉक्टर तुमची लक्षणे ओळखून तुम्हाला हा आजार झाला आहे सांगू शकता. सर्वात पहिले आजारातून मुक्त होण्यासाठी पाळीच्या दिवसांत आराम करा. उत्कृष्ट दर्जाचा आहार आणि त्याच्या वेळा पाळा. नियमित व्यायाम आणि योगा करा. तुम्हाला पहिलेच दुसरा आजार असेल तर त्याची तपासणी करून योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधे घ्यावीत. स्त्रीला मानसिक दृष्ट्या पाळीमध्ये सुदृढ ठेवण्यासाठी तिच्या घरच्यांचा खूप हातभार असावा लागतो. होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये या आजारासाठी उत्कृष्ट अशी औषधे आहेत ती तुम्हाला शारीरिक आणि मानसिकरीत्या सुदृढ बनवतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये