ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

आयटीच्या धाडीनंतर अभिजीत पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील मोठ्या नेत्याचा दावा!

पंढरपूर : (Pravin Darekar On Abhijit Patil) सध्या आयकर विभागाचं धाडसत्र सुरु असलेल्या तरुण उद्योजक अभिजीत पाटील यांना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट क्लिनचीट दिली आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, ते माझे मित्र असून यातून लवकरच बाहेर पडतील आणि इतकंच नाही तर अभिजीत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

आयकर विभागाने चौकशी केल्यानंतर प्रवीण दरेकर आणि डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख अभिजीत पाटील यांच्यात पंढरपूर येथे भेट झाली. प्रवीण दरेकर आज तिरंगा रॅलीसाठी पंढरपुरात होते. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले, त्यांच्यावर राजकीय द्वेशापोटी तक्रार केल्यानंतर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. मात्र, कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारचे चुकीचे काही आढळून आलेले नाही. अभिजीत पाटील माझे मित्र आहेत. त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही.

अभिजीत पाटील यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकण्याचे कारण म्हणचे त्यांनी आवघ्या काही वर्षांत राज्यात चार खासगी कारखाने विकत घेतले होते. त्यानंतर पंढरपुरातील विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढवून त्यामध्येही विजय मिळवल्याने अभिजीत पाटील हे पुन्हा चर्चेत आले होते. अशातच पाटील हे आयकर विभागाच्या निशाण्यावर आले आणि त्यांच्या चार कारखान्यांवर एकाच वेळी आयकर विभागाने धाड टाकली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये