न्युट्रीशियनफिचरराष्ट्रसंचार कनेक्ट

थकवा दूर करण्यासाठी आहारात या सात पदार्थांचा समावेश करा

जान्हवी अक्कलकोटकर, आहारतज्ज्ञ

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्ष आपणा सर्वांनाच गणपती-गौरी-दिवाळी या सणांची मजा लुटता आली नाही. आता सगळीकडेच मोकळीक झालेली आहे. सगळीकडे कसे उत्साहाने सण साजरे होताना आपल्याला दिसून येत आहेत. याबरोबरच घरातील स्त्रियांना या कामाच्या गडबडीत जाणवणारा थकवा यावरही आज काही लिहावंसं वाटलं.

शारीरिक थकवा येण्याची कारणे- सतत चिंता करण्याचा स्वभाव, इतर व्यसन, कामाचा शारीरिक व मानसिक ताण, कॅफिन व टॅनिनचे प्रमाणाबाहेर सेवन, दगदगीचे रुटिन, स्थूलत्वामुळे येणारे जडत्व व हालचालींवर परिणाम, झोप न लागणे अथवा अपुरी होणे, शिळे अथवा सत्त्व नसलेले पदार्थ पुन: पुन्हा गरम करून खाल्ले जाणे, यामुळे न्यूट्रिशनचा अभाव होतो व त्यामुळे शारीरिक थकवा वाढतो. शारीरिक थकवा दूर करण्यासाठी आपण आहारामध्ये छोटे बदल केल्यास अथवा काही पदार्थांचा समावेश आपल्या रोजच्या आहारात केल्यास शारीरिक थकव्यापासून आपल्याला मुक्तता मिळेल.

१) सनफ्लॉवर व पम्पकिन सीड्स : यामध्ये असणारे झिंक शरीरास ऊर्जानिर्मितीत मदत करते. मेटाबॉलिझम वाढवते. त्यामुळे स्थूलत्व कमी होऊन शारीरिक ताण कमी होईल. याचे सेवन आपण मधल्या खाण्याच्या वेळेला व इव्हिनिंग स्नॅक्समध्ये करू शकता. कोणत्याही प्रकारची कोशिंबीर, सॅलडमध्ये याचा वापर करू शकता.

२) केळी, पेरू, डाळिंब, पपई, कलिंगड यांसारखी फळे खाल्ल्यास आपल्याला कामासाठी लागणारी ऊर्जा मिळेल. मेंदूसाठी लागणारी ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्याचे काम फळांमधील फ्रुक्टोज करते. नैसर्गिक गोडवा असल्याने इन्स्टंट एनर्जी मिळते.

३) पालक :पालकांमध्ये लोह, फॉलिक ऍसिड ,मॅग्नेशियम, पोटॅशियम, विटामिन सी व कॅल्शियम असते .जे आपल्या दैनंदिन कामात उत्साह निर्माण करेल.

४) रंगीत सिमला मिरची हिरवी मिरची ही अँटिऑक्सिड ऑक्सीडेंट ने परिपूर्ण आहे यात विटामिन ए , बी सिक्स ,विटामिन सी व फॉलिक ऍसिड असते तेव्हा या प्रकारच्या भाज्या वापरून बनवलेले पदार्थ आहारात समावेश करून आपण आपला थकवा दूर करू शकतो.

५) शेंगावर्गीय भाज्या: पोटॅशियम, मॅग्नेशियम ,फॉस्फरस ,तांबे या खनिजांनी या भाज्या परिपूर्ण असतात. शेंगा अथवा बीन्स पासून आपण विविध पदार्थ बनवू शकतो . भाज्या, पराठे, कटलेट बनवून आपली शारीरिक ताकद वाढवून थकवा दूर करू शकतो.

६) दही, दूध, ताक: यात असणारे कॅल्शियम, प्रोटीन थकवा दूर करतात व यातून मिळणारी ऊर्जा दीर्घकाळ टिकते.

७) ग्रीन टी अथवा घरगुती काढा: यातील अँटिऑक्सिडंट मेंदूला तरतरी देतात व याच्या सेवनाने ताजेतवाने वाटते. मेटाबोलिझम वाढते, रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये