ताज्या बातम्यारणधुमाळी

“राज्यपालांना कुठे नेऊन घालायचं तिकडे घाला पण…”, शिंदे गटातील आमदाराची सडकून टीका

मुंबई | Sanjay Gaikwad On Bhagatsingh Koshyari – आपल्या सततच्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे आणि टीकेला धनी होणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करुन वादाला तोंड फोडलं आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यामध्ये आता शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. “या राज्यपालांना कुठे नेऊन घालायचं तिकडे घाला, पण महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर मराठी मातीतील माणूस बसवा”, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

संजय गायकवाड म्हणाले की, “भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवला त्यांचा राज्यपालांनी तीन ते चारवेळा एकेरी उल्लेख केला. छत्रपतींना शिवाजी म्हणातात आणि शिवाजी जुने झाले असंही सांगतात. या राज्यपालांना कळालं पाहिजे की, शिवविचार कधी जुना होत नाही. तसंच त्यांची तुलना जगातील कोणत्याही महापुरूषाशी करता येत नाही.”

“माझी भाजपच्या सर्व केंद्रीय नेत्यांना विनंती आहे की, ज्या राज्यपालांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, राज्य काय आहे हे ज्याला कळत नाही अशा माणसाला आपल्या राज्याच्या राज्यपालपदावर ठेऊन उपयोग नाही. राज्यपालपदावर या मराठी मातीतील माणूसच ठेवावा”, अशी मागणीही संजय गायकवाड यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये