ताज्या बातम्यामहाराष्ट्रशेत -शिवार

शेतकऱ्यांची चिंता वाढली! केवळ 10 दिवसांत कापसाच्या दरात दीड हजारांची घसरण

मुंबई : (Cotton prices have come down considerably) पांढरं सोनं ओळखल्या जाणाऱ्या कापूसाच्या भावात (Cotton Price) दिवसेंदिवस घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Farmers) सध्या चिंतेत आहे. मागील 10 दिवसांमध्ये राज्यात कापसाच्या दरात तब्बल दीड हजार रुपयांची घसरण झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, दहा दिवसांपुर्वी नऊ हजार रुपये क्विंटल दर असलेल्या कापसाला सध्या बाजारात केवळ 7 हजार 500 भाव मिळत आहे. विशेष म्हणजे बाजारात खूप कमी आवक असताना गेल्या दहा दिवसात कापसाच्या दरात एवढी घसरण झाली आहे.

मागील वर्षी कापूस हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना कापसाला कधी नव्हे तर ते 12 हजार रुपये इतका विक्रमी भाव मिळाला होता. त्यामुळं यंदा देखील शेतकऱ्यांना ही वाढ मिळेल अशी अपेक्षा होती. दर वाढेल या आशेनं शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच राखून ठेवणे पसंत केले आहे. मात्र, शेतकऱ्यांचा कापूस बाजारात आलेला नसतानाही सातत्यानं कापसाच्या दरात घसरण होत आहे. दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळं कापसाच्या दरात कधी वाढ होणार याची शेतकरी वाट बघत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये