भाऊ…तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले… गिरीश बापट यांच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीची भावनिक पोस्ट

मुंबई | भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांचे बुधवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भाजपने पुण्यात मोठा नेता गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गिरीश बापट यांना अनेक स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यातच अभिनेत्री रुचिता जाधव (Ruchita Jadhav) हिने गिरीश बापट यांना श्रद्धांजली देत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
गिरीश बापट यांच्यासोबत फोटो शेअर करत रुचिता जाधवने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, भाऊ…तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले…आज माझ्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली की ती कधीच भरू शकणार नाही…वडिलांसारखी तुमची माया आणि शाब्बासकीची थाप मला कोण देणार…तुम्हांला विसरणे तर शक्यच नाही…भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ , असं म्हणत रुचिताने गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे.