ताज्या बातम्यामनोरंजन

‘Ponniyin Selvan 2’ मधील ऐश्वर्याचा लूक पाहून अभिषेक झाला घायाळ; केली भन्नाट कमेंट, म्हणाला…

मुंबई | Aishwarya Rai – बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं (Aishwarya Rai Bachchan) ‘पोन्नियिन सेल्वन 1’ या चित्रपटामधून दमदार कमबॅक केलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. तसंच आता लवकरच या चित्रपटाचा ‘पोन्नियिन सेल्वन 2’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या सीक्वेलचा पोस्टर आणि टीझर ऐश्वर्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटात ऐश्वर्यानं नंदिनीची भूमिका साकारली असून तिचा लूक पाहून प्रेक्षक तिच्यावर फिदा झाले आहेत. चाहत्यांसोबतच ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चनही (Abhishek Bachchan) तिचा नवीन लूक पाहून तिच्या पुन्हा प्रेमात पडला आहे. तसंच तिच्या या किलर लूकवर त्यानं भन्नाट कमेंट देखील केली आहे.

ऐश्वर्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘पोन्नियिन सेल्वन 2’चा (Ponniyin Selvan 2) ट्रेलर शेअर केला आहे. तसंच तिनं एक पोस्टरसुद्धा शेअर केलं आहे. या पोस्टरला तिनं कॅप्शन दिलं आहे की, “त्यांच्या डोळ्यांमध्ये आग…त्यांच्या हृदयात प्रेम…त्यांच्या तलवारींवर रक्त…सिंहासनासाठी लढण्यासाठी चोल पुन्हा येणार.”

तसंच सध्या ऐश्वर्याचा नंदिनीच्या भूमिकेतला लूक पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. तसंच अभिषेकनंही ऐश्वर्याच्या लूकचं कौतुक केलं आहे. तिच्या लूकवर अभिषेकनं फायर इमोजी पोस्ट केली आहे.

दरम्यान, आज (29 मार्च) ‘पोन्नियिन सेल्वन 2’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच ऐश्वर्यासोबत चियान विक्रम, कार्थी, जयम रवी आणि त्रिशा कृष्णन हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये